उत्कर्ष विद्या मंदिरचा वर्ग १० वी च्या विदयार्थ्याचा निरोप समारंभ
आयुष्याच्या नवनवीन वाटा चोखळण्यासाठी संस्कारांची जी जमा पुंजी मिळाली ती खूप मोलाची आहे या शब्दात प्रमुख अतिथी मा. श्री. गिरीशजी खेर यांनी विचार व्यक्त केले. वर्ग १० ला आयोजित केलेल्या निरोपसमारंभात ते बोलत होते.
हा निरोप समारंभाचा कार्यक्रम नसून शालान्त परीक्षेसाठी शुभेच्या देण्याच्या हा कार्यक्रम आहे कारण जीवनात कुठल्याही वळणावर गरज पडली तर शिक्षक जीवनात मार्गदर्शन करतात असे ते म्हणाले .
त्यापूर्वी वर्ग ९ च्या विदयार्थ्यानी आपल्या ताई दादांना शुभेच्या दिल्यात.
१० व्या वर्गाला शुभेच्या देताना कार्यक्रमाचे अध्यक्ष मा . श्री चेतन काळे म्हणालेत की आयुष्यातील ही पहिली परीक्षा अत्यंत महत्वाची असते . स्वतःच्या जीवनातील काही प्रेरक प्रसंग सांगून जीवन हसत खेळत आणि परिश्रमपूर्वक जगा असा संदेश त्यांनी दिला.
शाळेतला विदयार्थी इतका मोठा व्हावा की त्याच्या सहीने अनेकांची कामे व्हावीत आणि त्याचा अभिमान शाळेला वाटावा असे विचार व्यक्त करीत शाळेचे प्रधानाचार्य मा . श्री. नितीन धनवंत यांनी विधार्थ्याना शुभेच्या दिल्या .
वर्ग १० च्या विदयार्थीनी आपला शालेय जीवनपट श्रोत्यांसमोर मांडून आपले अनुभव कथन केले .
संत गजानन महाराज प्रगट दिनानिम्मित्य या कार्यक्रमात गजानन स्तवन सदर करण्यात आले .
या कार्यक्रमात भारतीय उत्कर्ष मंडळाचे सदस्य व मार्गदर्शक मा . श्री . शिरीषजी वटे उपस्थित होते .
कार्यक्रमाचे संचालन नाजनीन चिस्ती ने केले. अतिथींचा परिचय प्राची बागडे हीने करून दिला तर आभार कु . रश्मी चौधरीने मानले .