अभिनव उपक्रम
पू . गुरुजींच्या रामटेक येथील घराच्या पूननिर्माणासाठी उत्कर्ष विद्या मंदिर खापरी च्या विध्यार्थ्यानी केले निधी संकलन ,
प.पू. गोळवलकर गुरुजींच्या जन्मदिनी शालेय विध्यार्थ्यानी निधी संकलन करून समर्पण केले.
प . पू . गोळवलकर गुरुजींच्या वडिलांनी स्व. भाऊजी गोळवलकरांनी १९२७ साली रामटेक येथे घर विकत घेतले. त्याच घरात श्री. गुरुजींचा निवास होता . ते घर आता जुने झाल्याने त्याच्या पुनर्निर्माणाची जबाबदारी भारतीय उत्कर्ष मंडळाने घेतली आहे. त्यात आपलाही खारीचा वाटा असावा या हेतूने विधार्थ्यानी ६०००/- रुपये ही धनराशी एका लहानशा कार्यक्रमातून भारतीय उत्कर्ष मंडळाचे उपाध्यक्ष मा. श्री. अनिलजी बाराहाते व स्वदेशी जागरण मंचाचे पश्चिम क्षेत्राचे प्रमुख म. श्री . अजयजी पत्की यांना सुपूर्द केली .
या कार्यक्रम प्रसंगी प्रमुख वक्ता म्हणून अजयजी पत्की यांनी श्री गुरुजींच्या बालपणीचा एक प्रसंग सांगून विधार्थ्यानी नेहमी सजग व सावध असावे असे सांगीतले . तसेच शिक्षकांचे लाडके शिष्य बना असा प्रेमळ सल्लाही दिला .
या कार्यक्रमास अतिथी म्हणून उपस्थीत असणारे मा . श्री. प्रकाशजी सरवटे यांनी विध्यार्थ्याना गुरुजींच्या जीवनातील प्रेरक प्रसंग सांगून आपले आयुष्य पितळीच्या भांड्याप्रमाणे लख्ख करावे असे सांगितले.
कार्यक्रमास उपस्थित मान्यवरांचा परिचय व स्वागत प्रधानाचार्य मा . श्री . धनवंत यांनी केले तर कार्यक्रमाचे संचालन व आभार प्रदर्शन सौ. सुषमा धनवंत यांनी केले.