भारतीय उत्कर्ष मंडळ द्वारा संचालित उत्कर्ष विद्या मंदिर खापरी-परसोडी येथे आरोग्य रक्षक किट वाटप कार्यक्रम

29 Jul 2021 11:46:21

भारतीय उत्कर्ष मंडळ_1&nbs 
 
 
भारतीय उत्कर्ष मंडळ_2&nbs
 

भारतीय उत्कर्ष मंडळ_3&nbs 
 
 
आज सोमवार दिनांक १७/०५/२०२१ रोजी भारतीय उत्कर्ष मंडळ द्वारा संचालित उत्कर्ष विद्या मंदिर खापरी-परसोडी येथे आरोग्य रक्षक किट वाटप कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाची सुरवात दीप प्रज्वलनाने करण्यात आली. भारतीय उत्कर्ष मंडळाचे सचिव श्री अतुल मोहरीर यांनी , पाहुण्यांचे स्वागत व परिचय करून दिला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक शिक्षा सेवा समितीचे सचिव श्री पद्माकर धानोरकर यांनी केले. शाळेचे अध्यक्ष डॉ श्री रमाकांत कापरे यांनी आरोग्य रक्षक किट मधील साहित्याबाबत माहिती दिली या नंतर मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्याना प्रातिनिधिक स्वरूपात ५ आरोग्य रक्षक किटचे वाटप करण्यात आले.
 

भारतीय उत्कर्ष मंडळ_4&nbs 
 
 

भारतीय उत्कर्ष मंडळ_5&nbs 
 
 
कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणुन भारतीय उत्कर्ष मंडळाचे अध्यक्ष श्री जयंतराव मुलमुले व प्रमुख पाहुणे म्हणून नागपुर महा नगर सह सेवा प्रमुख श्री संजयजी जोगळेकर यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाला विद्याभारती विदर्भाचे पदाधिकारी मा. श्री. श्रीकांतजी देशपांडे, व मा. श्री शैलेशजी जोशी तसेच विद्यार्थी, विद्यार्थांचे पालक ,व शाळेतील शिक्षक वृंद उपस्थित होते . कार्यक्रमाची सांगता शांती मंत्राने करण्यात आली. कार्यक्रम कोव्हीड नियमांचे पालन करून घेण्यात आला. वरील आरोग्य रक्षक किट पुढील काळात शाळेच्या परिसरातील २४ गावात राहणाऱ्या विद्यार्थ्यांना घरी जाऊन देण्यात येणार आहे. या उपक्रमाअंतर्गत शाळेतील शिक्षकांनी डोंगरगाव येथील विद्यार्थ्यांना आरोग्य रक्षक किट चे वाटप केले.
Powered By Sangraha 9.0