दि ब्लाइंड रिलीफ असोसिएशन, नागपुर ही अंधांच्या क्षेत्रात कार्यरत असलेली एक सामाजिक संस्था आहे. कोव्हिडच्या या काळात संस्थेने गेल्या वर्षी आपल्या संसाधनांचा वापर करून अनेक विद्यार्थी, कामगार व ज्येष्ठ नागरिक यांना जेवणाचे डबे पुरवले.
या वर्षी देखील संस्थेने सामाजिक भान ठेवून खापरी येथील भारतीय उत्कर्ष मंडळ, संचालित उत्कर्ष विद्या मंदिरा तर्फे पुरविण्यात येणार्या कोव्हिड आरोग्य रक्षक किटमध्ये १०० डिजिटल थर्मामीटर देऊन मदत केली आहे. हे थर्मामीटर भारतीय उत्कर्ष मंडळाचे सचिव श्री अतुल मोहरीर यांना हस्तांतरित करण्यात आले. या प्रसंगी दि ब्लाइंड रिलीफ असोसिएशनचे अध्यक्ष श्री मकरंद पांढरीपांडे, सचिव श्री नागेश जी कानगे, सहसचिव श्री गजानन रानडे व उत्कर्ष विद्या मंदिराचे श्री पद्माकर धानोरकर व रा. स्व संघ विदर्भ प्रांत सेवाप्रमुख श्री. सुनीलजी मेहेर उपस्थित होते.