शारीरिक व सांस्कृतिक महोत्सव थाटात साजरा

29 Dec 2022 16:43:36
 utkarsh mandal
 
भारतीय उत्कर्ष मंडळ द्वारा संचालित उत्कर्ष विद्या मंदिर खापरीच्या प्रांगणात शारीरिक व सांस्कृतिक महोत्सव साजरा करण्यात आला.
दिनांक १९/१२/२०२२ सोमवारला अतिथी मा. श्री. चंद्रशेखर घुसे यांच्या हस्ते ध्वजारोहण करुन उद्घाटन करण्यात आले. दीपप्रजवलन करुन विधीवत प्रारंभ करण्यात आला.
मा. अतिथी श्री. चंद्रशेखर घुशे व अध्यक्ष श्री. पद्माकर धानोरकर यांचा परिचय प्रधानाचार्यांनी केला तर पाहुण्याचे स्वागत श्री. पद्माकर धानोरकर यांनी केले
शिशू मंदिराच्या विद्यार्थ्यांपासून ते माध्यमिक विभागापर्यंतच्या विद्यार्थ्यांनी विविध प्रकारच्या कवायती सादर करण्यात आल्या यात रिंग ड्रील, अॅरोबिक्स, फ्लॉवर ड्रील, सूर्यनमस्कार डंबेल्स, लेझीम, मनोरे, नी युध्द, प्रात्यक्षिकांचे सादरीकरण केले व खेल खिलाडी खेल या नृत्यगिताने बहार आणली.
या बहारदार सौ. मेघा महल्ले यांनी अहवाल वाचन केले.
मा. अतिथी यांनी उद्बोधनातून फुटबॉल या खेळाला प्राधान्य दिल्याने विद्यार्थ्यांमध्ये चापल्य वृध्दींगत होईल व शरीर व मन विकसीत होईल असा विचार मांडला.
अध्यक्षिय भाषणातून श्री. पद्माकर धानोरकर सरांनी कार्यक्रमाबद्दल विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्यात व उत्तरोत्तर प्रगती साठी आशिर्वाद दिलेत.

utkarsh mandal 
 
या कार्यक्रमाला भारतीय उत्कर्ष मंडळाचे विश्वस्त शिरीषजी वटे, श्री. निलेशजी दामले, श्री. अभयजी गोखले, परिसरातील नागरिक, विद्यार्थी पालक उपस्थित होते.
कार्यक्रमंचे सूत्रसंचालन सौ. अमृता यावलकर व सौ. शुभांगी वाट यांनी केले.
दिनांक २०/१२/२०२२ मंगळवारला सांस्कृतिक कार्यक्रमांचे उद्घाटन डॉ. शशिकला गुलाबराव वंजारी माजी कुलगुरु एस.एन.डी.टी. विद्यापीठ, मुंबई यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने करण्यात आले. प्रधानाचार्यांनी अतिथींचा परिचय करुन दिला व स्वागत शाळा समितीचे अध्यक्ष डॉ. श्री. रमाकांत कापरे यांनी केले.
ओ माय फ्रेंड गणेशा या नृत्यावर शिशू मंदिरच्या विद्यार्थ्यांनी नृत्य केले. तर चापल्य दाखवत श्रेयसच्या विद्यार्थ्यांनी चलो बच्चो उठाओ बस्ता हे नृत्य सादर केले.
प्राथमिक विभागात दम दम दमकेगा इंडिया, खेळ मांडला, स्कूल चले हम, ठाण लिया हमने इ. नृत्यगीताद्वारे अनुक्रमे स्वच्छता अभियान, शेतकऱ्यांची कथा व व्यथा, सर्व शिक्षा अभियान व शिक्षणातून होणारी प्रगती इ. संकल्पना मांडल्या.
वर्ग ५ ते ७ च्या विद्यार्थ्यांनी राजं आलं राजं आलं, देश रंगीला, ना आना इस देश मे मेरी लाडो, इ. नृत्य गीतातून शिवाजी आमचा राजा, देशभक्तीपर गीतातून विविधता, बेटी बचाओ, देश बढाओ ही संकल्पना सादर करण्यात आली.
वर्ग ८ च्या विद्यार्थ्यांनी वाढदिवस संकल्पनेच्या माध्यमातून भारतीय पध्दतीने वाढदिवस कसा साजरा केला जातो, औक्षवणाचे महत्व काय हे पटवून दिल, तसेच कार्यक्रमातून वृक्षारोपण, गोपूजन करण्यात आले. वाढदिवसाचे गीतनृत्य सादर केले.
वर्ग ९ व १० च्या विद्यार्थ्यांनी मिशन मंगळ, बुंद बुंद बने लहर या दोन नृत्यांच्या आधारे मंगळ अभियान, सर्व धर्म समभाव ही संकल्पना साकारली.
शैक्षणिक संकल्पनेवर आधारित प्रेरणागीत उच्च माध्यमिकच्या विद्यार्थ्यांनी सादर केले. शाळेचा अहवाल वाचन प्रधानाचार्यांनी सादर केले तसेच आभार मानले.
डॉ.. सौ. शशिकला वंजारी यांनी उद्बोधनातून पालकांशी संवाद साधताना विद्यार्थ्यांचे कौतुक केले. विद्यार्थ्यांना या शाळेत प्रविष्ट करुन भारतीय शिक्षण पध्दतीची ओळख करुन दिली म्हणून पालकांचे आभार मानले. तसेच येऊ घातलेली नविन शिक्षा पध्दती ही विद्यार्थ्यांच्या आधीच अंगवळणी पडलेली असून आत्म ज्योती नमोस्तुते या ओळीच्या माध्यमातून मन:शांतीची सवय मुलांना आताच लागलेली आहे म्हणुन मुलांचेही कौतुक केले.
अध्यक्षीय भाषणातून डॉ.. श्री. रमाकान्त कापरे यांनी कथेच्या आधारे सकारात्मकता विद्यार्थ्यांनी अंगी बाणली तर विद्यार्थी हा जीवनात यशस्वी होणार हे निश्चीत आहे या शब्दातून प्रगती व्हावी अशी अपेक्षा व्यक्त केली.
या कार्यक्रमांचे संचालन वर्ग १० च्या विद्यार्थ्यांनी व शाळेतील शिक्षीका सौ. तेजस्वीनी गोखले यांनी केले
या कार्यक्रमाल भारतीय उत्कर्ष मंडळाचे विश्वस्त व पदाधिकारी तसेच विद्या भारतीचे पदाधिकारी,परिसरातील नागरिक, विद्याथ्याँचे पालक उपस्थित होते.
 

utkarsh mandal 
Powered By Sangraha 9.0